शिंदे यांच्या प्रश्नावर अजित पवार यांनी पत्रकारांनाच लगावला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात रहायचे आहे की नाही?”
एक चुकली म्हणून दुसरी शिंदे गटाकडून देण्यात आली. ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील वाद उफाळून समोर आले. यानंतर आता हा वाद मिटला असतानाच आणखी एक सर्व्हे पुढे आला आहे. ज्यात अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दोन जाहिराती आल्या ज्यामुळे राज्यात जोरदार राजकिय चर्चा झाली. तर एक चुकली म्हणून दुसरी शिंदे गटाकडून देण्यात आली. ज्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील वाद उफाळून समोर आले. यानंतर आता हा वाद मिटला असतानाच आणखी एक सर्व्हे पुढे आला आहे. ज्यात अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे. यावरून विचारणा केली असता विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पत्रकारावर भडकले. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. यावेळी त्यांनी पत्रकारांना, तुम्ही काय बोलताय? किती धादांद खोटे बोलत आहात. तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही का?. मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता आम्हाला 26 टक्के मते मिळाली आहेत आणि तुम्ही काही तरीच काय सांगत आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रहायचे आहे की नाही” असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.