शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना नारळं? भाजप मंत्र्याचं मोठं वक्तव्य; ‘पाच मंत्र्यांचा अहवाल’
चार पाच मंत्र्यांची हकालपट्टी होणार असा दावा सध्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून खासदार संजय राऊत आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तसा दावा देखील केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकिय चर्चांना उत आला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील चार पाच मंत्र्यांची हकालपट्टी होणार असा दावा सध्या ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून खासदार संजय राऊत आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तसा दावा देखील केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकिय चर्चांना उत आला आहे. त्यावरून आता अनेक तर्क विर्तक ही लावले जात आहेत. याचदरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी याबात सुटकं वक्तव्य केलं आहे. त्यांनी अशी बामती सांगतचं कोण असं म्हटलं आहे. तर शिंदे गटाच्या या पाच मंत्र्यांचा जो विषय आहे तो फेक आहे. ती बातमीच चुकीची आहे. असा कुठलाही अहवाल भाजपने मागवलेला नाही. मी बोर्डचा सदस्य आहे. त्यामुळे अशा पद्धतीची माहिती मला तरी नाही. त्यामुळं मला वाटतं ही बातमी कुठंतरी पेरली गेलेली आहे. तर मंत्रीमंडळ विस्तावरव बोलताना महाजन म्हणाले, यावर दिल्लीहून वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल मिळेल. त्यावर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे निर्णय घेतील.