खळबळजनक दाव्यानंतर दीपाली सय्यद यांचा घणाघात; आरोप आणि तक्रार

खळबळजनक दाव्यानंतर दीपाली सय्यद यांचा घणाघात; आरोप आणि तक्रार

| Updated on: Apr 08, 2023 | 7:48 AM

सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाने केला आहे. तर त्यांचे संबंध हे डॉन दाऊदशी असून त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या बाबत एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. त्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांच्या माजी स्वीय सहाय्यकाने केला आहे. तर त्यांचे संबंध हे डॉन दाऊदशी असून त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आले आहेत. हे आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपावर दीपाली सय्यद यांनी खुलासा केला आहे. सय्यद यांनी, शिंदे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच मीडिया समोर दाखवण्यात आलेल्या पुराव्यात कुठलेही तथ्य नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच याप्रकरणी आपण ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी सय्यद यांनी याच्यामागे राजकीय व्यक्तीचा हात असून ते लवकरच समोर येईल असेही म्हटलं आहे.

Published on: Apr 08, 2023 07:48 AM