शिवसेनेच्या जाहिरातीवरून शिंदे यांच्यावर कोणाची टीका; म्हणाला, ‘सर्व्हेचं माहित नाही, पण मोठी झेप’

शिवसेनेच्या जाहिरातीवरून शिंदे यांच्यावर कोणाची टीका; म्हणाला, ‘सर्व्हेचं माहित नाही, पण मोठी झेप’

| Updated on: Jun 13, 2023 | 1:39 PM

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

नाशिक : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब झाला आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा देखील विसर पडल्याचं समोर आलं आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी, मला आश्चर्य वाटतंय, नेहमी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि खाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. पण आज उपमुख्यमंत्री फडणवीसच जाहिरातीतून एकदम गायब झाले. त्यामुळे ही शिंदे साहेबांची मोठी झेप आहे असं म्हणालं लागेल असे ते म्हणालेत. तर बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात, मात्र बाळासाहेबांचा फोटोही त्यांनी येथे वापरला नाही. फडणवीसांना ते विसरले तर विसरुदे पण बाळासाहेबांना तर निदान विसरता कामा नये असे त्यांनी म्हणत हा सर्व्हे आणि त्याची आकडेवारी कुणी काढली? हे माहित नसल्याचं ते म्हणालेत.

Published on: Jun 13, 2023 01:39 PM