शिरसाट-अंधारे प्रकरणात सुळेंची उडी; ट्विट करत केली कारवाईची मागणी
शिरसाट यांनी अंधारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवार निशाना साधला आहे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याती वाद आता चांगलाच पेटला आहे. शिरसाट यांनी अंधारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवार निशाना साधला आहे. तसेच शिरसाट हे सरकारमधील पक्षाचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. त्याचबरोबर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई अशी मागणी केली आहे.
Published on: Mar 31, 2023 11:52 AM
Latest Videos