जाहिरातीवरून अजित पवार याचं कोणाला आव्हान? मिरची लागली भाजला? आव्हानावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया…
वर्तमानपत्रांमधील जाहिरातीत शिंदे-फडणवीस यांना सर्वाधिक टक्के लोकांची पसंती असल्याचं म्हटलं आहे. त्यावरूनच विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना टार्गेट करत टीका करणं सुरू केलं होतं. यावरुनच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली होती.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. त्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना टार्गेट करत टीका केली होती.
वर्तमानपत्रांमधील जाहिरातीत शिंदे-फडणवीस यांना सर्वाधिक टक्के लोकांची पसंती असल्याचं म्हटलं आहे. त्यावरूनच विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना टार्गेट करत टीका करणं सुरू केलं होतं. यावरुनच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली होती. तसेच इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर करा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं.
त्यावरून भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. तसेच त्यांनी अजित पवार यांच्या या आव्हानावर प्रतिक्रिया देताना, आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत. घोडा मैदान दूर नाही. तर निवडणुका लागल्याकी त्यावर उत्तर देऊ असं म्हटलं आहे.
Published on: Jun 14, 2023 08:31 AM
Latest Videos