केंद्रीय कायदामंत्री यांच्याशी बंद दाराआड चर्चा, भेटीत काय ठरलं? राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण

केंद्रीय कायदामंत्री यांच्याशी बंद दाराआड चर्चा, भेटीत काय ठरलं? राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण

| Updated on: May 04, 2023 | 11:34 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनाम्यावरून भाजप आता राज्यात सक्रीय पावले उचलताना दिसत आहे. आधी अमित शाह आणि आता केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू हे राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे दिसत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल हा कधी येऊ शकतो. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार गेलं. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनाम्यावरून भाजप आता राज्यात सक्रीय पावले उचलताना दिसत आहे. आधी अमित शाह आणि आता केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) हे राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे दिसत आहे. केंद्रीय कायदामंत्री रिजिजू यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर मुंबईमध्ये येऊन विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीमध्ये बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. मात्र यावर आपल्यात राजकीय अशी काहीच चर्चा न झाल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितलं आहे. तर रिजिजू आणि आपले हे जुने संबंध आहेत. ते जुने मित्र असल्यानेच ही भेट झाली असेही नार्वेकर यांनी म्हटलं आहे. मात्र सरकार स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेण्यासाठी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून रिजिजू यांनी नार्वेकर यांची भेट घेतल्याचे कळत आहे.

Published on: May 04, 2023 11:34 AM