बाळासाहेबांवरून संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार; म्हणाले…
शिंदे यांनी बाळासाहेबांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांबाबत बोलावं अशी खरमरीत टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असोकी देशाचे त्या गद्दारांविरोधात आयुष्यभर लढत राहिले
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अयोध्येत निशाना साधला होता. तर टीका करताना ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधत जात आहेत असे म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार पलवार करताना, शिंदे यांनी बाळासाहेबांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांबाबत बोलावं अशी खरमरीत टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असोकी देशाचे त्या गद्दारांविरोधात आयुष्यभर लढत राहिले. त्यांची एक भूमिका राहिली आहे. गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. तरच अशी गद्दारी बंद होईल असे बाळासाहेबांचे विचार होते माझे नाहीत. तर ज्या विचारांबद्दल शिंदे बोलत आहेत. त्याप्रमाणे त्यांना आणि त्यांच्या 40 आमदारांना लोकांनी पकडून मारावं का? असा सवाल त्यांनी उपस्थित करताना 40 आमदारांना दिलेली सुरक्षा कोणा देशभक्तला मिळत नाही अशी टीका केली आहे.