आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंच उत्तर; म्हणाले…
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्यापासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आता कलियुग आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार पण कमी शब्दात प्रत्युत्तर दिल आहे. ज्यामुळे सध्या अयोध्याचा दौरा आणि राजकीय टिकांचीच चर्चा रंगली आहे. आदित्य यांच्या टीकेवर, आदित्य ठाकरेंचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आपण काम करत असल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 08, 2023 01:43 PM
Latest Videos