‘… आता शिंदे तरी कदमांना जवळ ठेवतील का?’ अंधारे यांचा कदमांवर निशाना
बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या वाघाला पाळलं होतं. तुम्ही शेळ्या मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यात आणि बाळासाहेबांमध्ये फरक आहे, असं रामदास कदम म्हणाले होते
नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचाही योग्य समाचार ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेत टोला लगावला आहे. खेडमधील भाषणाची खिल्ली उडवली आहे. यावेळी अंधारे यांनी रामदास कदम यांच्या भाषणाची खिल्ली देखील उडवली आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या वाघाला पाळलं होतं. तुम्ही शेळ्या मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यात आणि बाळासाहेबांमध्ये फरक आहे, असं रामदास कदम म्हणाले होते. त्यावर अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, वाघाला पाळत नसतात. कुत्री, मांजरं पाळत असतात. तर भर सभेतच त्यांनी समोर मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख शिंदे असताना, मलाच बाळासाहेब मुख्यमंत्री करणार होते, असा दावा केला. त्यावरही निशाना करत, आता कदमांना शिंदे जवळ ठेवतील का? असा सवाल केला आहे.