दरे गावात जायला सरळ रस्ता नाही, मात्र मुख्यमंत्र्यांच्या शेतावर हेलिपॅड; अंधारे यांचा शिंदे यांना सवाल
दरे गावात जायला नीट रस्ते नाहीत. त्या गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतावर उतरायला मात्र अगदी दोन दोन हेलिपॅड आहेत. कधीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक अवस्था इतकी चांगली झाली याच्यावर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करावं असा टोला लगावला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बोचरे ट्विट केले होते. त्यावर आता खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या त्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, शिंदे यांच्यावर टीका करताना, ते ट्विट निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रीप्टचे आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःला सर्वसामान्य म्हटलं आहे. ते स्वतःला कायम सर्वसामान्य वगैरे सांगतात. मग सर्वसामान्य माणसाच्या शेतामध्ये कधी हेलिपॅड (Helipad) आणि हेलिकॉप्टर उतरलेलं कोणी पाहिलं आहे का? पण शिंदे यांच्या शेतात दोन दोन हेलिपॅड आहेत. त्यांच्या शेतात हेलिकॉप्टर उतरतं. तर दरे गावात जायला नीट रस्ते नाहीत. त्या गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतावर उतरायला मात्र अगदी दोन दोन हेलिपॅड आहेत. कधीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक अवस्था इतकी चांगली झाली याच्यावर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करावं असा टोला लगावला आहे.