'ते रावण आम्ही रामभक्त, आगीशी खेळू नका', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

‘ते रावण आम्ही रामभक्त, आगीशी खेळू नका’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

| Updated on: Aug 31, 2023 | 7:37 PM

राष्ट्रभक्त कसा असावा तर राजनाथ सिंग यांच्यासारखा असावा. चिंगारी का खेल बुरा होता है... ही अटलजींची कविता आज ही आठवते. चीन आणि पाकिस्तानला इशारा देण्याचे काम राजनाथ सिंग यांनी केलं. त्यांच्या आवाजात तसा दरारा आहे. पण, काही जण मात्र...

अहमदनगर : 31 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत असे विरोधक म्हणतात. पण, अनेक चेहरे कोणाला असतात हे सर्वांना माहीत आहे. रावणाला दहा तोंडे असतात. ते जे तिकडे आहेत ते रावण आहेत आणि आम्ही इथे जे होत ते सगळे रामभक्त आहोत हे लक्षात ठेवा, एका माणसाच्या विरोधात एवढे एकत्र आले की त्या फोटोत चेहरेसुद्धा नीट दिसत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर केली आहे. आज विरोधी पक्ष एकत्र आले त्यांना एवढच सांगतो आगीशी खेळू नका. महाभारतात कोणाचा पराभव झाला हे लक्षात असू द्या. महाभारतात पांडवांचा विजय झाला तर कौरवाचा पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील याची खात्री देतो, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

Published on: Aug 31, 2023 07:37 PM