जिवलग मित्रानेच मुख्यमंत्री शिंदे यांची काढली लायकी, म्हणाले हिंमत असेल तर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळच्या सर्वात घनिष्ठ मित्रानेच त्यांची लायकी काढली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडला असला तरी आम्ही तेथेच आहोत.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळच्या सर्वात घनिष्ठ मित्रानेच त्यांची लायकी काढली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष सोडला असला तरी आम्ही तेथेच आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक घ्या मग तुम्हाला तुमची लायकी कळेल असा शब्दात शिंदे यांना आव्हानही दिले आहे. उद्धव ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ही टीका केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत आणि त्यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. दुसऱ्याचे वडील माझे वडील होऊ शकत नाही. ते इतर कुणाचे वडील होऊ शकत नाही. तुमच्यात हिमंत असेल तर निवडणूक लावा तुमची लायकी कळेल, असे आव्हान राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Published on: Feb 14, 2023 09:20 AM
Latest Videos