‘झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने शेतावर आराम करतात’; सामानातून शिंदे यांच्यावर टीका

‘झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने शेतावर आराम करतात’; सामानातून शिंदे यांच्यावर टीका

| Updated on: Aug 14, 2023 | 11:36 AM

त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाना साधताना टीकास्त्र सोडलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी, राजकारणातील डिजीटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही.

मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज शरद पवार आणि अजित पवार भेटीवर टीका केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाना साधताना टीकास्त्र सोडलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी, राजकारणातील डिजीटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही. चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आणि त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. तर ते आजारी पडल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करू असे देखील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जाहिर केलं आहे. तर ते २४ तास काम करताना म्हणूनच ते आजारी पडत आहेत. तर त्यांचे काम दिसत नाही. तर कधीही पद जाईल यातून त्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळेच ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साराऱ्यात शेतावर जाऊन आराम करातय. २४ तास काम आणि ७२ तास आराम असे त्यांच्या जीवनाचे गणित झाल्याची टीका यावेळी सामनातून करण्यात आली आहे.

Published on: Aug 14, 2023 11:36 AM