प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री, एका पक्षात तर चार... गिरीश महाजन यांची तुफान फटकेबाजी

प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री, एका पक्षात तर चार… गिरीश महाजन यांची तुफान फटकेबाजी

| Updated on: Jun 05, 2023 | 8:24 PM

अजित पवार सत्तेत असताना त्यांचे गृहमंत्री 100 कोटी रुपये मागायचे, ते आता कुठे बाहेर आलेत. नवाब मलिक अजून आत आहेत अन् तुम्ही आम्हाला शिकवताय?

बुलढाणा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये वजन ठेवल्याशिवाय कुठली कामे होत नसल्याचा आरोप केला. पण, अजित पवार यांना स्वप्न पडले असेल. ते अजित पवार सत्तेत असताना त्यांचे गृहमंत्री 100 कोटी रुपये मागायचे, ते आता कुठे बाहेर आलेत. नवाब मलिक अजून आत आहेत अन् तुम्ही आम्हाला शिकवताय? असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना लगावला. तिकडे नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागलेत. पण, आता तर प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री तयार व्हायला लागले आहेत. त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करू म्हणजे त्यांची हौस पूर्ण होईल. नरहरी झिरवाळ म्हणतात अजित पवार मुख्यमंत्री होतील. सगळ्याच पक्षांना वाटते मी मुख्यमंत्री आमचाच. काही वैयक्तिक कोणाकोणाचे भक्त आहेत. त्यामुळे अशी वक्तव्ये येत आहेत. एका पक्षात तर चार चार मुख्यमंत्री व्हायला लागले आहेत. हे होतील ते होतील, असे बोर्ड लागतील. काही दिवसांनी तर प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री करावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.

Published on: Jun 05, 2023 08:24 PM