राज्यपालांचा पक्षपातीपणा उघडः अंबादास दानवे

राज्यपालांचा पक्षपातीपणा उघडः अंबादास दानवे

| Updated on: Sep 03, 2022 | 9:49 AM

राज्यपालांचा निर्णयही महत्वाचा असला तरी त्यांच्याकडून पक्षपाती पणा केला जात असल्याची तक्रारही अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार असताना विधान परिषदेसाठी मविआने पाठवलेली 12 नावांची यादी रद्द करा असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे भाजप सरकार आता राज्यपालांना  आता नव्या 12 नावांची नवी यादी देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे-ठाकरे यांचा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेसाठी जी बारा नावं पाठवली होती, त्याबाबतचा निर्णयही न्यायालयात आहे, त्यामुळे तो निर्णय लांबणीवर पडला असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. याबाबत राज्यपालांचा निर्णयही महत्वाचा असला तरी त्यांच्याकडून पक्षपाती पणा केला जात असल्याची तक्रारही अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Published on: Sep 03, 2022 09:19 AM