Eknath Shinde : महावितरण कर्मचाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक

Eknath Shinde : महावितरण कर्मचाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक

| Updated on: Jan 05, 2023 | 1:49 PM

वीजवितरण ही आत्यावश्यक सेवा असल्याने त्यावर वीज कंपन्यांतील कर्मचऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. तसेच उर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बोलवलेल्या बैठकीत नक्कीच योग्य निर्णय होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई : महावितरणच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांतील कर्मचऱ्यांनी तीन दिवसांच्या संप पुकारला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच नवी अपडेट समोर येत आहे. वीज कंपन्यांतील कर्मचऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी शिंदे यांनी यासंदर्भार उर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बेठक घेतील. तसेच शासनाचा कोणताही निर्णय हा झालेला नाही. त्यामुले संपावर जाणे योग्य नसल्याचेही शिंदे म्हणाले.

त्याचबरोबर शिंदे यांनी वीजवितरण ही आत्यावश्यक सेवा असल्याने त्यावर वीज कंपन्यांतील कर्मचऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री यांनी बोलवलेल्या बैठकीत नक्कीच योग्य निर्णय होईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jan 04, 2023 04:39 PM