हे बाळासाहेबांच्या आणि दिघेसाहेबांच्या विचारांचं सरकार : एकनाथ शिंदे

हे बाळासाहेबांच्या आणि दिघेसाहेबांच्या विचारांचं सरकार : एकनाथ शिंदे

| Updated on: Jan 06, 2023 | 3:04 PM

हे सरकार सर्वसामान्यांचं असल्यानेच ते आमच्यावर आणि बाळासाहेबांची शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत. हे सरकार बाळासाहेबांच्या आणि दिघेसाहेबांच्या विचारांचं सरकार असल्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत आहेत. मी त्यांचं याधीच स्वागत केलं आहे

मुंबई : राज्यातील सत्तांतरणानंतर आता देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश होतानाच दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईत देखिल अनेक जन हे शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. यावर पत्रकारांना विचारले असता, त्यांनी हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्यांचं असल्यानेच ते आमच्यावर आणि बाळासाहेबांची शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत. हे सरकार बाळासाहेबांच्या आणि दिघेसाहेबांच्या विचारांचं सरकार असल्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत आहेत. मी त्यांचं याधीच स्वागत केलं आहे.

याचबरोबर त्यांनी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होत असलेल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा पत्रकारांना दिल्या.