CM Uddhav Thackeray | ‘शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार’-tv9
हिंदुत्व, बाळासाहेबांची शिवसेना, भेटी नाकारल्या, या सगळ्या बंडखोर आमदारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आहेत.
मुंबई : राज्याचं राजकारण हे सध्या एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडखोरीच्या चौफेर फिरताना दिसत आहे. गेल्या दोन शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी राज्याला आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जेरिस आणले आहे. तर शिंदे यांना रसद पुरविण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे आज एकदाचं जे काही आहे ते होऊन जाऊदे अस म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली बाजू फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडली. तसेच शिंदेसह भाजपला चोख उत्तर देखील दिलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे फेसबूक लाईव्हमधून (Facebook Live) म्हणाले, तुम्हाला जे वाटतं ते एकदा समोर येऊन बोला. जर तुम्हाला मी पदावर नको असेन तर तसं सांगा. मी हे पदही सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंदुत्व, बाळासाहेबांची शिवसेना, भेटी नाकारल्या, या सगळ्या बंडखोर आमदारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आहेत.