Special Report | औरंगाबादेत येण्याआधी मुख्यमंत्री Uddhav Thackeray अॅक्शन मोडमध्ये
महाराष्ट्र दिनी मनसेची राज गर्जना झाल्यानंतर आता औरंगाबादेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. येत्या 08 जून रोजी शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
औरंगाबादः महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर त्याच्या नामांतरणाच्या राजकारणावरून सध्या चांगलेच चर्चेत आहे. आधी बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhajinagar) केले होते. त्यावरून शिवसेनेला भाजपसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर यानंतर भाजपने येथे आक्रोश मोर्चा काढत पाण्यावरून शिवसेनेवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणल्याने येथे मुख्यमंत्री ठाकरे यांना विरोध होण्याची शक्यता आहे. तर येत्या 8 तारखेला होण्याऱ्या सभेच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याच्या सुचना केल्या आहेत. राज्यात होऊ घातलेल्या निवडणूकीच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट