CM Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री राहील नाही राहिल; प्रेम कायम ठेवा’-tv9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हमधून जनतेशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री राहील नाही राहिल पण प्रेम कायम ठेवा
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. हे सरकार राहणार की पडणार असे तर्क लावले जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून आपली बाजू मांडताना आज फेसबूक लाईव्हमधून जनतेशी संवाद साधला. तसेच ते म्हणाले, बांधवांनो पदे येतात आणि जात असतात. आयुष्याची कमाई काय? तुम्ही जे काही काम करता. त्यातून जनतेची जी प्रतिक्रिया असते ती खरी कमाई असते. या अडीच वर्षात जे तुम्ही मला प्रेम दिलं. कुठे झाली तरी तुम्ही बोललात. याच माध्यमातून आपण बोलत आलो. माझ्याकडे मुख्यमंत्रीपद हे अनपेक्षितपणे आलं. आता मी या पदाला चिपकून बसत नाही. तुम्ही सांगा मी पायउतार होतो. मी आता जे बोलत आहे ते नाटक नाही. तुम्ही मला फक्त सांगा, मी मुख्यमंत्रीपद सोडलंच म्हणून समजा. मी माझं मन घट्ट करून बसलो आहे. मुख्यमंत्रीपदी राहायची माझी अजिबात इच्छा नाही. ‘मुख्यमंत्री राहील नाही राहिल. पण हे प्रेम असंच ठेवा.