Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावरुन औरंगाबादकडे रवाना

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावरुन औरंगाबादकडे रवाना

| Updated on: Jun 08, 2022 | 7:01 PM

औरंगाबादेतील सभेसाठी मुख्यमंत्री ठाकरे वर्षावरुन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Live) यांच्या औरंगाबादमधील सभेची (Aurangabad Speech)चर्चा होती. तर अनेक शिवसैनिकांना या सभेची ओढ लागली होती. तर या सभेत मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणतात याकडे अख्या राज्याचे लक्ष लागून राहीलं होतं. ते या आपल्या सभेत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर (Hindutva) होणाऱ्या टीकेला उत्तर देणार का? नामांतराच्या वादावर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता औरंगाबादेतील सभेसाठी मुख्यमंत्री ठाकरे वर्षावरुन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची विराट सभा होणार असून सभेसाठी जनसागर लोटला आहे. औरंगाबादेत शिवसैनिकांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे.

 

Published on: Jun 08, 2022 07:01 PM