Kolhapur हा भगव्याचा बालेकिल्ला, आजही आहे आणि उद्या ही राहणार-Uddhav Thackeray

| Updated on: Apr 10, 2022 | 8:03 PM

भाजपने भगव्यावरून सुरु केलेल्या राजकारणावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो भगवा? तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यामागे निळा, काळा, हिरवा लावाल आणि म्हणाल तर तो भगवा आम्ही स्वीकारणार नाही. अस्सल भगवा शिवरायांचा, साधुसंतांचा आणि वारकऱ्यांचा आहे.

कोल्हापूर | देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, लोकांनी झिडकरला. हिंदू हृदयसम्राट म्हणल्यावर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)… त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते होऊ शकत नाहीत. हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. भाजपने भगव्यावरून सुरु केलेल्या राजकारणावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो भगवा? तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यामागे निळा, काळा, हिरवा लावाल आणि म्हणाल तर तो भगवा आम्ही स्वीकारणार नाही. अस्सल भगवा शिवरायांचा, साधुसंतांचा आणि वारकऱ्यांचा आहे. याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाहीये..