Amravati landslide : चिखलदरा ते घटांग मार्ग बंद; प्रवाशांना मोठा फटका? नेमकं कारण काय?

Amravati landslide : चिखलदरा ते घटांग मार्ग बंद; प्रवाशांना मोठा फटका? नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 26, 2023 | 11:53 AM

तर जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचदरमयान रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर अजूनही तेथे लोकांचे पुनर्वसन केलं जात आहे. याचदरम्यान सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात भलीमोठी दरड कोसळली. ज्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती

अमरावती, 26 जुलै 2023 | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. तर जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचदरमयान रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला होता. तर अजूनही तेथे लोकांचे पुनर्वसन केलं जात आहे. याचदरम्यान सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात भलीमोठी दरड कोसळली. ज्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. तर आता अमरावतीच्या मेळघाटमधील आमझरी गावाजवळ दरड कोसळली आहे. येथे दरड कोसळल्याने चिखलदरा ते घटांग मार्ग बंद करण्यात आला आहे. ज्याचा फटका प्रवाशाना होत आहे. तर दरड कोसळल्याने रस्त्यांवर दगड आले असून वाहतूक थांबली आहे. तर यामुळे चिखदरा येथे जाणारे पर्यटक अडकून पडले आहेत. रस्त्यावरील दरड कोसळल्याने तयार झालेला मलबा हटवण्याचे काम सुरू होणार आहे.

Published on: Jul 26, 2023 11:53 AM