गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...

गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय…

| Updated on: Sep 07, 2024 | 4:33 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरातील गणरायाची प्रतिष्ठापना यंदा त्यांच्या घरातील लहान मुलांनी म्हणजेच त्यांच्या नातवंडांनी केली आहे. त्यामुळे आजोबा आणि आजी म्हणून गडकरी दाम्पत्य सुखावले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे म्हणजे अजातशत्रू असलेले व्यक्तीमत्व, केंद्रात त्यांच्याकडे कोणतेही खाते असो किंवा नसो ते आपल्या कामातून नेहमीच चर्तेत असतात. त्यांच्या नागपूरातील निवासस्थानी गणरायाचं आगमन झाले आहे. त्याच्या गणपतीचे यंदाचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या घरातील कच्च्याबच्च्यांनी गणपतीची वर्गणी काढून गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. गडकरी यांच्या पत्नींनी या संदर्भात टीव्ही 9 मराठीला माहिती दिली की अगदी मूर्ती निवडण्यापासून ते पूजा करणे ही सर्व कामे नातवंडांनी केली आहेत. आम्ही केवळ प्रत्येक पाचशे रुपये वर्गणी दिल्याचे त्यांनी सांगितले. यातून नेतृत्व गुण वाढतात. त्यामुळे मुलांवर विश्वास ठेवला तरी ती कोणतेही अवघड काम कसे चुटकी सरशी करतात याचे प्रत्यय गडकरी यांच्या घरातील गणपती पाहून येत आहे….

Published on: Sep 07, 2024 03:49 PM