Nandurbar | खा की खा, तिखट! मिरचीचं उत्पादन वाढलं; चटणीची चिंता मिटली
नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो. यावर्षी ही मिरचीची आवक वाढली आहे. यावर्षी दोन लाख 13 हजार मिरचीची आवक झाली आहे. तर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार असल्याने ही आवक दोन लाख 25 हजारच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे
नंदुरबार : राज्यातील अनेक जिल्ह्यात मिरची मिळत नसल्याने मिरचीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका हा गृहिणींच्या बजेटवर पडत आहे. आता मात्र त्यांच्यासाटी एक आंदनाची बामी असून नंदुरबारमध्ये मिरचीची आवक चांगलीच वाढली आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जातो. यावर्षी ही मिरचीची आवक वाढली आहे. यावर्षी दोन लाख 13 हजार मिरचीची आवक झाली आहे. तर एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हंगाम सुरू राहणार असल्याने ही आवक दोन लाख 25 हजारच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी संपूर्ण हंगामात दोन लाख पाच हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. यावर्षी मिरचीची लागवड क्षेत्र देखील वाढली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काही प्रमाणावर मिरचीला फटका बसला. पण तरी देखील यावर्षी मिरचीची आवक चांगलीच वाढली आहे.
Latest Videos