chitra wagh troll : भाजप नेत्या चित्रा वाघ ट्विटवर ट्रोल, मंत्री संजय राठोड आणि पती किशोर वाघ यांच्यावरुन नेटिझन्सनं घेरलं
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यानंतर त्या ट्रोल होत आहे. यावेळी नेटिझन्सनं मंत्री संजय राठोड आणि वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावरून सोशल मीडियावर ट्रोल केलंय.
मुंबई : भाजपा (BJP) ने त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर (Shiv sena) केलेली टीका नेटिझन्सला काही आवडल्याचं दिसत नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यानंतर त्या ट्रोल होताना दिसत आहे. यावेळी नेटिझन्सनं मंत्री संजय राठोड आणि वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावरून सोशल मीडियावर वाघ यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मंत्री संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडी सरकारअसताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सातत्याननं टीका केली. यानंतर अखेर संजय राठोड यांना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला होता.