उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्ष, चित्रा वाघ यांचा टोला

“उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्ष”, चित्रा वाघ यांचा टोला

| Updated on: Jul 26, 2023 | 7:24 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत आज आणि उद्या सकाळी 08 वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

नाशिक, 26 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर मुलाखत आज आणि उद्या सकाळी 08 वाजता प्रसारित केली जाणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्ष आहे. तू म्हणायचं, मी बोलायचं आणि आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Published on: Jul 26, 2023 07:24 AM