चर्चगेट वसतीगृहातील बलात्कार प्रकरणात सुप्रिया सुळेंनी राजकारण आणू नये, भाजपच्या महिला नेत्याचा सल्ला

“चर्चगेट वसतीगृहातील बलात्कार प्रकरणात सुप्रिया सुळेंनी राजकारण आणू नये”, भाजपच्या महिला नेत्याचा सल्ला

| Updated on: Jun 07, 2023 | 4:24 PM

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेवर सुप्रिया सुळे यांनी जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो तेव्हा कायमच अशा गोष्टी कशा घडतात? असा सवाल केला आहे. यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो तेव्हा कायमच अशा गोष्टी कशा घडतात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. नेहमी बोलत असतात, दीड वर्षापूर्वी त्यांचं सरकार राज्यात होतं, पण मला या घटनेला राजकीय वळण लावायचं नाही. पण संवेदनशील असलेल्या मोठ्या नेत्या कशा काय यात राजकारण आणू शकतात? सुप्रिया सुळे फार मोठ्या नेत्या आहात राज्याच्या, यात राजकारण आणू नका”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Published on: Jun 07, 2023 04:24 PM