Chitra Wagh on Sushma Andhare | ‘पुत्रप्रेमात आंधळा धृतराष्ट्र कोण हे अडीच वर्षे पाहिलंय, चित्रा वाघा यांचा शिवसेनेवर पलटवार
'अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार. नुकतेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावे,' अशी टीका वाघ यांनी केलीय.
मुंबई : भाजपा (BJP) ने त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसाने आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केले आहे. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार. नुकतेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावे, अशी टीका त्यांनी केली आहे. धृतराष्ट्राने डोळ्यावरची पट्टी काढावी. डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंना वाघ यांनी लगावलाय.

चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र

औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
