‘आमचे नेते असूदेत किंवा कुणीही, थोडसं तोलून-मापून’; गावित यांच्या त्या वक्तव्यावर भाजप महिला नेत्याची आगपाखड

‘आमचे नेते असूदेत किंवा कुणीही, थोडसं तोलून-मापून’; गावित यांच्या त्या वक्तव्यावर भाजप महिला नेत्याची आगपाखड

| Updated on: Aug 22, 2023 | 7:53 AM

भाजप नेते तथा आदिवाशी मंत्री विजयकुमार यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या डोळ्यावरून वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता जोरदार राजकारण तापलेलं आहे. तर त्यावक्तव्यावरून विरोधकांनी आणि महिल्या नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे.

मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित सतत कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा’, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर याच वक्तव्यावर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील टीका केली आहे. वाघ यांनी लोकप्रतिनिधींनी विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये बोलताना तारतम्य बाळगावं. विजयकुमार हे आमचे जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्र राज्याचे मंत्रीही आहेत. आणि आदिवासी बांधवांच्यासमोर मत्स्य विभागाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी ते वक्तव्य केलं. पण माध्यमांनी फक्त त्यांचे दोन तीन शब्दचं दाखवले. त्यामुळे महिलांबाबत कुणीही असू दे. मग ते भाजपचे आमचे नेते असूदेत किंवा कुणीही असूदेत. बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. थोडसं तोलून-मापून बोललंच गेलं पाहिजे. तर अशा वेड्यावाकड्या वक्तव्याला समर्थन नाहीच.

Published on: Aug 22, 2023 07:53 AM