Video | कर्तव्यपथावर घुमला शिवरायांचा जयजयकार, 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ

Video | कर्तव्यपथावर घुमला शिवरायांचा जयजयकार, 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ

| Updated on: Jan 26, 2024 | 3:17 PM

देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यंदा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन जगाला झाले. तसेच भारताच्या सामरिक शक्तीचे प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आले. यंदा कर्तव्य पथावर विविध राज्याचे चित्ररथातून तेथील संस्कृती आणि परंपरेचे यथार्थ दर्शन झाले. महाराष्ट्राचा चित्ररथ येत्याच 'जय शिवाजी, जय भवानी' चा एक जयघोष झाला. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकच्या 350 व्या वर्षानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता.

नवी दिल्ली | 26 जानेवारी 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली कर्तव्य पथावर संचलन करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेकच्या 350 व्या वर्षानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथाकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. या रथावर किल्ला उभारण्यात येऊन त्याच्या समोर बाल शिवाजींना माता जिजाऊ पुस्तकातील गोष्टी सांगत त्यांच्यावर संस्कार करीत असल्याचे दृश्य साकारण्यात आले होते. तर रथाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज राजदरबारात सिंहासनावर आरुढ झाल्याचे दिसत होते. आणि त्यांच्या समोर संभाजी महाराज उभे असून दरबारातील इतर मंत्री आणि दादोजी कोंडदेव दिसत होते. यावेळी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषेत रणरागिणी महिला दांडपट्टा चालविताना दिसत होत्या. या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या रथाकडे कौतूकाने पाहाताना दिसत होत्या.

Published on: Jan 26, 2024 03:16 PM