ठाणे आगीवरून प्रशासनासनावर जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले हे अपयश...

ठाणे आगीवरून प्रशासनासनावर जितेंद्र आव्हाड आक्रमक; म्हणाले हे अपयश…

| Updated on: Apr 19, 2023 | 10:46 AM

आव्हाड यांनी प्रशासनासनावर टीका करताना हे पालिका प्रशासनाचे अपयश आणि निष्काळजीपणा असल्याचे म्हटलं आहे. सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्कला आग लागली. मात्र माहिती मिळूनही 5 तास झाल्यानंतरही अधिकारी पोहचले नव्हेत असा आरोप त्यांनी केला

ठाणे : येथील सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी, घोडबंदर रोड, ठाणे येथील ओरियन बिझनेस पार्क इमारतीला आग लागली. यात 80 ते 90 ऑफीस गाळे, वाहणे आगीच्या भष्यस्थानी पडले आहेत. जवळजवळ 500 कोंटींचे नुकसान झालं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. यावेळी आव्हाड यांनी प्रशासनासनावर टीका करताना हे पालिका प्रशासनाचे अपयश आणि निष्काळजीपणा असल्याचे म्हटलं आहे. सिने वंडर मॉल आणि ओरियन बिझनेस पार्कला आग लागली. मात्र माहिती मिळूनही 5 तास झाल्यानंतरही अधिकारी पोहचले नव्हेत असा आरोप त्यांनी केला. तर जवळजवळ 500 कोटींच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? अनेकांच्या नोकऱ्या जातील त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Apr 19, 2023 10:46 AM