वावड्या कोणी उठवत असेल, तर…; शंभूराज देसाई यांचा कोणाला थेट इशारा, काय आहे कारण?
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कालच दिल्याचे त्यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांचे परिवार आणि ते स्वतः श्रीसेवक आहेत. आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत
मुंबई : निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात आलेल्या लाखो लोकांपैकी 11 लोकांचा उष्माघाताने बळी गेला. त्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी हे हा पुरस्कार परत करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, असं कोणी अधिकारवाणीनं बोलतच असेलतरच प्रश्न विचारा म्हटलं आहे. तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कालच दिल्याचे त्यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांचे परिवार आणि ते स्वतः श्रीसेवक आहेत. आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या वावड्या कोणी उठवत असेल तर ते योग्य नाही. तर आपल्याला विश्वास आहे की अशा पद्धतीच्या विचार सुद्धा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मनात येणार नाही. फक्त जाणीवपूर्वक शिंदे आणि आम्हाला अडचणीत आणण्यासाठी अशा पद्धतीच्या अफवा, बातम्या फिरवल्या जात आहेत. ज्यांना काही अर्थ नाही.