VIDEO : चटई गुंडाळावी तसा रस्ता गुंडाळला! रस्ता बनवलाय की अंथरले अंथरूण? कोणत्या गावातलं नागरिक संतापले?

VIDEO : चटई गुंडाळावी तसा रस्ता गुंडाळला! रस्ता बनवलाय की अंथरले अंथरूण? कोणत्या गावातलं नागरिक संतापले?

| Updated on: Jun 05, 2023 | 9:51 AM

अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रोडचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. इतकच काय तर तो रस्ता हाताने उखडत गावकऱ्यांनी निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. हा किस्सा ताजा असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा समोर आला आहे.

औरंगाबाद : काही दिवसांपुर्वी जालन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंडज व्हायरल झाला होता. ज्यात अंबड तालुक्यातील कर्जत-हस्तपोखरी रोडचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. इतकच काय तर तो रस्ता हाताने उखडत गावकऱ्यांनी निकृष्ट कामाची पोलखोल केली होती. हा किस्सा ताजा असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा समोर आला आहे. येथे डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर फक्त आरोप न करता त्याची पोलखोल केली आहे. यावेळी फुलंब्री तालुक्यातील वाघोळा ते नांद्रा येथील डांबरी रस्ता हाताने नागरिकांनी उखडला. तसेच तो चटई गुंडाळावी तसा रस्ता गुंडाळला. त्यामुळे रस्ता बनवलाय की अंथरूण अंथरले असा प्रश्न नागरिक करताना दिसत आहेत.

Published on: Jun 05, 2023 09:51 AM