सरन्यायाधीश चंद्रचूड अन् मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Sep 23, 2024 | 12:56 PM

मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्व, मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे 23 सप्टेंबरला अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Follow us on

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावीत नव्या इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे, सरन्यायाधीश चंद्रचूड एकत्र येणार आहेत. दरम्यान यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावीत इमारतीच्या भूमी पूजनासाठी शिंदे आणि सरन्यायाधीश चंद्रचूड एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिंदेंची शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावरुनही निवडून आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुप्रीम कोर्टात गेलेत. दरम्यान हे प्रकरण देखील सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्यासमोरच आहे. विशेष म्हणजे चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरुन 8 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान 10 नोव्हेंबरच्या नंतरच होईल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे 8 नोव्हेंबर निवृत्ती होण्याआधीच सत्तासंघर्ष तसेच शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी मोदी चंद्रचूड यांच्या घरी गेले होते, आणि आता चंद्रचूड आणि शिंदे एकत्र येत असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय.