युती तर झाली खरी मात्र कार्यकर्त्यांमध्ये राडा; कुठं भिडले भाजप-राष्ट्रवादीचे कार्यक्रते, नेमकं कारण काय?
सत्तेत एकत्र नेते आले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये वाद होताना समोर येत आहे. तर कार्यकर्ते या ना त्या कारणाने भिडत आहेत. सध्या राज्याच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले असून भाजपसोबत युतीत आहेत. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे
कोपरगाव/अहमदनगर : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन राष्ट्रवादीचा उदय झाला. एक मविआत राहिली. तर अजित पवार गट हा सत्तेत सहभागी होत युतीचा भाग झाला. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले आहेत. नेत्यांची मने सत्तेच्या समिकरणांनी जुळली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये टशन हे पाहायला मिळतच असते. यातूनच मग राडा होता. असाच राडा भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अहमदनगरच्या कोपरगावात पाहायला मिळाला आहे. कोपरगाव शहरात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून भुमीपूजन फलकावरून वाद पेटला आहे. तर रस्त्याच्या कामाच्या भुमिपूजन फलकावरून वाद झाल्याने भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. तर जोरदार राडा देखील झाला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि भापजच्या बोर्डसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड लावला. यानंतर हा वाद – विवाद दोन तास धुमसत राहिल्याने अखेर पोलीसांनाच यात हस्तक्षेप करावा लागला. ज्यानंतर हा वाद थांबला. तर येथील दोन्ही फलक देखील पोलीसांनी हटवले आहेत.