दोन गटातील वाद विकोपाला; तुफान राड्यात 19 जण जखमी, 22 जणांवर गुन्हे दाखल
तब्बल 19 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर 22 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादाक बाब म्हणजे गावात दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक बोलवावी लागली
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वरूड गावात एका घटना घडली आहे. ज्यामुळे तब्बल 19 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर 22 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादाक बाब म्हणजे गावात दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक बोलवावी लागली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील वरूड गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही हाणामारी फक्त जुना वाद विकोपाला गेल्याने झाली. ज्यात 19 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर नऊ जणांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आल आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी तब्बल 22 लोकांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. दंगा काबू पथकासह पोलिसांची मोठी कुमक गावातील परिस्थिती हाताळून आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
Published on: Jun 13, 2023 04:50 PM
Latest Videos