Devendra Fadnavis : .. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोलले
CM Devendra Fadnavis On Aurangzeb Tomb : शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी औरंगजेब याच्या कबरीच्या वादावर भाष्य केलं.
या देशात फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं महिमामंडन होईल. औरंगजेबाच्या कबरीचं होणार नाही. औरंगजेबाची कबर कशाला हवी? पण 50 वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने संरक्षित स्थळ घोषित केलं आहे, त्यामुळे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आली आहे, हे आमचं दुर्दैवं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवंडी येथील कार्यक्रमात बोलताना दिली आहे. मात्र काहीही झालं तरी त्याच्या कबरीचं महिमामंडन येथे होऊ देणार नाही, असं आश्वासन देखील यावेळी फडणवीस यांनी दिलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो प्रयत्न तिथेच चिरडून टाकला जाईल, असंही ते म्हणाले.
Published on: Mar 17, 2025 12:59 PM