CM Devendra Fadnavis : नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख
CM Devendra Fadnavis On Chhaava Movie : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनाच्या कामकाजात बोलताना नागपूरच्या राड्यावर भाष्य केलं. यात त्यांनी छावा या चित्रपटाचा उल्लेख केला.
छावा चित्रपटातून महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला गेला. मला कुठल्या चित्रपटावर टीका करायची नाहीये. पण त्यानंतर चित्रपट पाहून राज्यात लोकांच्या भावनाही मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या. औरंगजेबाबद्दलचा रागही मोठ्या प्रमाणावर बाहेर येतोय. पण हे सगळं जरी असलं, तरी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हंटलं आहे. राज्यात औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा मुद्दा पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. काल नागपूरमध्ये याच मुद्द्यावरून दोन गटात तूफान राडा झाला. त्याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.