इथून 200 खाजगी बस निघणार, दसरा मेळाव्याची तयारी

इथून 200 खाजगी बस निघणार, दसरा मेळाव्याची तयारी

| Updated on: Sep 28, 2022 | 10:35 AM

शिवसेनेतील या दोन गटांपैकी कुणाचं संख्याबळ जास्त हा मुद्दा आगामी काळात जास्त चर्चिला जाणार आहे. त्यामुळेच आगामी दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त शक्तिप्रदर्शन करण्याची स्पर्धा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटात लागली आहे. 

गजानन उमाटे,  नागपूरः दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरु आहे. मराठवाड्यातून (Marathwada) शिवसेना (Shivsena) विरोधात शिंदे गटातील (Ekanth Shinde Group) नेते तयारीला लागले आहेत. तर विदर्भातही शिंदे गटाचे नेते सक्रीय झाले आहेत. पूर्व विदर्भातूनच जवळपास २०० खाजगी बसगाड्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी शिंदे गटाने १५ ते २० बस बुक केल्या आहेत. किरण पांडव यांच्यावर विदर्भातून कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी पोहोचतील असं म्हटलं जात आहे. शिवसेना कुणाची हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. शिवसेनेतील या दोन गटांपैकी कुणाचं संख्याबळ जास्त हा मुद्दा आगामी काळात जास्त चर्चिला जाणार आहे. त्यामुळेच आगामी दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त शक्तिप्रदर्शन करण्याची स्पर्धा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटात लागली आहे.

Published on: Sep 28, 2022 10:33 AM