कोस्टल रोड ते शिवसृष्टी, रायगडावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या 3 घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. तिसरी म्हणजे शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Latest Videos