मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, समृद्धीप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग एक्स्प्रेसवे होणार!
जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रीमोट दाबून शुभारंभ झाला. शासन आपल्या दारी या योजनेतून विविध लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. "मागच्या सरकारच्या काळात अनेत प्रकल्प थांबवले गेले", असं एनाथ शिंदे म्हणाले.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रीमोट दाबून शुभारंभ झाला. शासन आपल्या दारी या योजनेतून विविध लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. “मागच्या सरकारच्या काळात अनेत प्रकल्प थांबवले गेले”, असं एनाथ शिंदे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. “मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, नागपूर-मुंबई महामार्ग जसा केला तसाच प्रकारचा मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करत आहोत. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण प्राधिकरण बनवत आहोत. यामुळे कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळल्याशिवाय राहणार नाही. समृद्ध कोकण घडवण्यासाठी आपण प्रयत्न करु,तसंच आता शासकीय कामांसाठी सतत शासनाच्या दारी खेटे मारावे लागणार नाहीत कारण सरकार तुमचं आहे. अनेक दाखले एकाच छताखाली देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आठी ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला”, असं त्यांनी सांगितलं.