मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा, म्हणाले…

| Updated on: Dec 19, 2023 | 8:08 PM

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलं.

नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय काय केलं याची माहिती देत फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचेही जाहीर केलं. तर राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिनाभरात देणार असल्याने फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटलं. राज्य मागासवर्ग महिन्याभरात अहवाल सादर करेल. त्याचं अवलोकन केलं जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधी मंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मात्र इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील शिंदेंनी यावेळी दिली.

Published on: Dec 19, 2023 08:08 PM
शिवसेना अपात्रतेच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? अनिल देसाई यांनी सविस्तर सांगितलं…
विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर, ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल