मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ‘आम्ही देणारे लोकं आहोत, घेणारे लोकं नाहीत. तर लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं माझं स्वप्न आहे’, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढे शिंदे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे अडकायला नको, म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिलेत’, असं शिंदे म्हणले तर आता २० नोव्हेंबर रोजी निवडणुका आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे याच नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. कारण आम्ही देणारे लोकं आहोत. घेणारे लोक नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणांचा चांगला आशीर्वाद मिळाला तर लाडक्या बहिणांना योजनेत मिळाले १५०० रूपये वाढवून त्यांना देऊ. माझ्या बहिणांना मला लखपती बनवायचं आहे, असं माझं स्वप्न आहे. असंही पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितेल.