मुख्यमंत्र्यांनी आनंद मठात साजरी केली धुळवड, विरोधकाांना एका शब्दात दिल्या शुभेच्छा; बघा काय म्हणाले
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात साजरी केली धुळवड, महाराष्ट्रातील जनतेसह विरोधकांना नेमक्या काय दिल्या शुभेच्छा ?
ठाणे : संपूर्ण राज्यभरात होळी आणि धुळवडीचा उत्साह सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांसह नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी साजरी केली. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करत होळी साजरी करण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या फोटोला रंग लावून होळी सर्वांसह साजरी केली. आनंद मठात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी धुळवडीचा मनसोक्त आनंद घेतला. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ही धुळवडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांनी राजकारणातील विरोधकांवर प्रश्न विचारताच त्यांनी एका शब्दात शुभेच्छा दिल्या. राजकारणातील विरोधकांना शुभेच्छा देऊन सगळ्यांना सदबुद्धी मिळो अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.