CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर

| Updated on: Aug 13, 2022 | 10:17 AM

आजच्या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहेत. या आधी ते त्यांच्या साताऱ्याच्या मूळ गावी देखील गेले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागातही त्यांनी दौरे केले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. जिल्ह्याच्या पुरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या विविध भागांचे दौरे करीत आहेत. आजच्या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहेत. या आधी ते त्यांच्या साताऱ्याच्या मूळ गावी देखील गेले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागातही त्यांनी दौरे केले. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खाते वाटपाला होत असलेल्या विलंबावरून शिंदे भाजप सरकारवर विरोधकांची टीका सुरु आहे. लवकरच खातेवाटप जाहीर होईल  शी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार देत आहेत. देशाच्या स्वातंत्र्य दिली ध्वजारोहण करणाऱ्या आमदारांची यादी प्रसिद्ध झाली असून यात उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 19 आमदार वेगवेगळ्या जिल्ह्याचे ध्वजारोहण करतील.

Published on: Aug 13, 2022 10:17 AM