गायरान जमिनींसंदर्भात महत्वाची बातमी; नोटीस बजावण्याबाबत सरकारची ठाम भूमिका, पाहा...

गायरान जमिनींसंदर्भात महत्वाची बातमी; नोटीस बजावण्याबाबत सरकारची ठाम भूमिका, पाहा…

| Updated on: Feb 27, 2023 | 3:52 PM

राज्यभरातील गायरान जमीनींवर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. पाहा व्हीडिओ....

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनींसदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून असलेल्या जमिनी आणि लोकांची घरं रिकामी करावी लागणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात काही भागात नोटीसही देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील गायरान जमीनींवर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना आता नव्यानं नोटीस बजावण्यात येणार आहे.