‘त्या’ व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

| Updated on: Sep 13, 2023 | 6:04 PM

VIDEO | सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत अखेर दिलं स्पष्टीकरण, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेमकी काय झाली होती चर्चा, बघा व्हिडीओ

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडीओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार हे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडीओ आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल व्हिडीओवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्वतः एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले असून त्यासंदर्भात होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, ‘मी आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार पत्रकार परिषदेसाठी आलो. यावेळी आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आपल्यात मराठा आरक्षणाबाबात जी सकारात्मक चर्चा झाली त्यावरच आपण बोलूयात. या व्यतिरिक्त राजकीय गोष्टींवर प्रतिक्रिया नको. जास्त प्रश्नोत्तर नको, अशा प्रकारची आमची चर्चा चालू होती’

Published on: Sep 13, 2023 06:04 PM
Navneet Rana म्हणाल्या, ‘यशोमती ताई आमच्या ननंदबाई..,’; अन् काय दिला खोचक सल्ला?
‘… वेळ येऊ देऊ नका’, उद्धव ठाकरे यांनी उडवलेल्या खिल्लीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा