9 तारखेला गोड बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल; शीतल म्हात्रे यांनी दिले संकेत
शिंदेगटाच्या नेत्या शीतल मात्रे यांनी मोठ्या घडामोडींचे संकेत दिलेत. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत? पाहा...
मुंबई : शिंदेगटाच्या नेत्या शीतल मात्रे यांनी मोठ्या घडामोडींचे संकेत दिलेत. अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यात काही गोष्टी या सिक्रेट आहेत. येणाऱ्या काळामध्ये तसेच 9 तारखेला मोठी आणि गोड बातमी लोकांना ऐकायला मिळेल, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देखील काही आयोजन करायचा आहे. यासाठी बैठक आयोजित केली होती. आज मुख्यमंत्री नाहीयेत परंतु आमचे इतर नेते, सचिव, आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आहे, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
Published on: Feb 02, 2023 03:02 PM
Latest Videos